Thyroid ‘ही’ लक्षणे दिसताय सावधान ! कदाचित तुम्हाला थायरॉईड असू शकतो…
आजच्या आधुनिक काळात कोणालाच आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. वेळ असला तरी दुसऱ्या कामांमध्ये तो निघून जातो. त्यातही आपली बदलती आणि चुकीची जीवनशैली, अयोग्य खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्बवतांना दिसत आहे. यामुळे खासकरून महिलांमध्ये थायरॉईड ची (Thyroid) समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. पुरुषांपेक्षा जास्त महिला थायरॉईड सारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरात आयोडीनची कमतरता असते. भारतात थायरॉईडच्या आजाराचे निदान झालेल्या लोकांची संख्या भरपूर आहे. भारतात अंदाजे ३२ टक्के लोकं थायरॉईडच्या विविध प्रकारच्या विकारांनी ग्रस्त आहेत. थायरॉईड हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. थायरॉईडचे दोन प्रकार आहेत, त्यातील एक म्हणजे ‘हायपरथायरॉईडीझम’ (Hyperthyroidism) आणि ‘हायपोथायरॉईडीझम’ (Hypothyroidism) (Thyroid) हा आजार शरीरातील हार्मोनल असंतुलित झाल्यानंतर उद्भवतो. घशामध्ये थायरॉईड ग्रंथी असते, जी हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करते...